‘कृतार्थ म्हार्दोळ’ संघटनेच्या वतीने ‘ऑनलाईन’ श्री गणेश पूजाविधी

गणेशभक्तांची ही अडचण दूर करण्यासाठी ‘कृतार्थ म्हार्दोळ’ या संस्थेने तज्ञ पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पूजाविधीचे ध्वनीमुद्रण (ऑडिओ) आणि ध्वनीचित्रीकरण (व्हिडीओ) सिद्ध केले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा बसवण्यात यावी ! – मनसेची मागणी

जागतिक आरोग्य संस्था आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ यांनी मान्यता दिलेले ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांवर बसवावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

राजगुरुनगर नगरपरिषद भ्रष्टाचारप्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंद

नगरपरिषदेतील कर्मचार्‍यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते.

‘८ दिवसांत न्याय न दिल्यास आत्महत्या करीन !’ – निलंबित अन्न निरीक्षक राजीव कोरडे यांची शासनाला चेतावणी

अन्न आणि औषध प्रशासनाचे एक प्रामाणिक अधिकारी तथा निरीक्षक राजीव कोरडे यांना ४ मासांपूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एका प्रकरणात राजकीय दबावाला बळी न पडल्याने त्यांचे निलंबन केल्याची चर्चा आहे.