धर्मांध मलिक शेख पसार !
मिरज (जिल्हा सांगली), २४ ऑक्टोबर (वार्ता.) – विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी ऋषिकेश कुंभार या युवकास त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना नसल्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५० सहस्र रुपयांचे पिस्तुल आणि ४०० रुपयांचे काडतूस जप्त करण्यात आले, तसेच या पिस्तुलाची विक्री करणारा मलिक शेख याच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
२१ ऑक्टोबर या दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना कमानवेस ते आळतेकर सभागृहाकडे जाणार्या रस्त्यावर ऋषिकेश कुंभार संशयास्पदरित्या थांबला असल्याचे लक्षात आले. त्याची पडताळणी केली असता त्याच्याकडे पिस्तुल आणि काडतूस आढळले. त्याने सदर पिस्तुल मलीक शेख याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.