नवी मुंबई – ‘भारतीय जनता पक्षा’चे लोकसभा निवडणूक सहप्रमुख रामचंद्र घरत यांची पुन्हा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.
‘मधल्या काळात नवी मुंबई शहरात फक्त नेते दिसत होते; मात्र भाजप दिसत नव्हती. आता माझी पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून शतप्रतिशत भाजप पुन्हा शहरात दिसेल’, अशी प्रतिक्रिया घरत यांनी व्यक्त केली आहे.