उत्तरप्रदेश सरकार ‘रामकथा संग्रहालय’ ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडे सोपवणार !

ट्रस्टने हे संग्रहालय कह्यात घेतल्यानंतर ही कागदपत्रे जनतेसाठी खुली करण्यात येतील, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या कलाकृतीही सर्वांना पहाण्यासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

शाळिग्राम यात्रेमुळे चिनी ‘अजेंड्या’ला (षड्यंत्राला) धक्का !

चीन सदैव भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. नेपाळही चीनच्या प्रभावाखाली येऊन भारताला लांब ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो; परंतु शाळिग्राम यात्रेने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

श्रीराम मूर्तीसाठी आणलेल्या शाळिग्राम शिळेच्या मार्गावरील गावातून पी.एफ्.आय.च्या ८ कार्यकर्त्यांना अटक

यापूर्वीच श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली असल्याने पकडलेल्या या कार्यकर्त्यांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे.

श्रीरामाच्या मूर्तीसाठीच्या शाळिग्राम शिळा नेपाळमधून अयोध्येत पोचल्या !

ओडिशा आणि कर्नाटक राज्यांतूनही शिळा आणण्यात येणार !

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शोधण्यात आली शाळिग्राम शिळा !

या शाळिग्राम शिळेवरच भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीद्वारे सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्‍विक आनंद आणि देवाची कृपा हे ६ लाभ होतात, अशी मान्यता आहे.

श्रीराममंदिराच्‍या बांधकामावर आत्‍मघाती आक्रमणाचा कट !

‘जिहादी आतंकवाद नष्‍ट कधी होणार ?’, असा प्रश्‍न प्रत्‍येक भारतियाच्‍या मनात गेली अनेक वर्षे येत आहे. ही समस्‍या सोडवण्‍यासाठी भारताने पाकला नष्‍ट करण्‍यासह देशातील धर्मांधांची जिहादी मानसिकता नष्‍ट करणे आवश्‍यक आहे. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

व्‍यक्‍ती, समाज, निसर्ग आणि परमात्‍मा यांच्‍यात संतुलन साधणे म्‍हणजे धर्म ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचे काम जानेवारी २०२४ मध्‍ये पूर्ण होणार ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्येत ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारावे !

अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

श्रीराममंदिर उभारणीसाठी काणकोण येथील पर्तगाळ मठाच्या वतीने १ कोटी ८ लाख रुपयांची देणगी

अयोध्येतील श्री राममंदिराच्या उभारणीसाठी पर्तगाळ, काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या वतीने १ कोटी ८ लाख ७७ सहस्र ७७७ रुपयांची देणगी देण्यात आली आहे. मठाधिपती श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह नोव्हेंबर मासात अयोध्येला जाणार

एकनाथ शिंदे हे नोव्हेंबर मासात अयोध्या येथे जाऊन प्रभु श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. या वेळी त्यांच्या पक्षाचे सर्व आमदारही त्यांच्यासमवेत असणार आहेत.