श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्रीरामजन्मभूमीला निधी अर्पण

श्रीरामजन्मभूमी निधी संकलन अभियानास धनादेश देताना पू. भिडेगुरुजी, प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सतीशबापू ओतारी, गणेश मेळावणे आणि इतर हिंदुत्वनिष्ठ

सातारा – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने श्रीरामजन्मभूमी निधी संकलन अभियानास अर्पण निधी म्हणून ११ सहस्र १११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडेगुरुजी यांच्या वंदनीय उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातारा जिल्हाध्यक्ष सतीशबापू ओतारी, गणेश मेळावणे, शेखर पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पू. भिडेगुरुजी म्हणाले की, सर्व धारकर्‍यांनी श्रीरामजन्मभूमी निधी संकलन अभियानात सहभागी व्हावे. तसेच २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार्‍या गडकोट मोहिमेत अधिकाधिक धारकर्‍यांनी सहभागी व्हावे. रायगड येथील सुवर्ण सिंहासन खडा पहारा योजनेतही सहभागी व्हावे.