श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पुण्यात आक्रोश सभा

यासह वासनांध नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी सरकारवर वैध मार्गांनी दबाव आणला पाहिजे !

बलात्कार्‍यांना भर चौकात फाशी देऊन मृतदेह गिधाडांसमोर फेका !

गुन्हेगार बलात्काराचे कृत्य समाजात राहून करत असतो; मात्र त्याला शिक्षा कारागृहाच्या चार भिंतींमध्ये दिली जाते. असे केल्याने गुन्हेगारांना भीती वाटत नाही. त्यामुळे अशांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे.

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन करणार्‍याला फाशी शिक्षा

इराणमध्ये सध्या चालू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाच्या प्रकरणी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा, तसेच अन्य ५ जणांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोषींवर सरकारी इमारतींना आग लावण्याचा, दंगली भडकवण्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध कट रचल्याचा आरोप आहे.

‘भारतमाता की जय’ म्हटल्यामुळे मिशनरी शाळेने विद्यार्थ्याला दिली शिक्षा !

‘भारतमाता की जय’ म्हटल्याने शिक्षा होण्याला हा भारत आहे कि कोणता कट्टर ख्रिस्ती अथवा इस्लामी देश ? संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोन धर्मांधांना फाशीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या दोन धर्मांध आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पंकज कुमार श्रीवास्तव यांच्या न्यायालयाने आरोपींना ‘पॉक्सो’ कायद्यासह इतर विविध कलमांखाली दोषी ठरवले.

बलात्कार्‍यांना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवा !

बलात्कारांच्या प्रकरणांतील दोषींना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवले, तर इतर कुणीही असा गुन्हा करतांना एक सहस्र वेळा विचार करील, असे विधान भाजप सरकारमधील माहिती, पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.

देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना धमक्या

स्वाती मालिवाल यांनी म्हटले आहे की, माझी सुरक्षा देव करेल. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. मी सत्यासाठी बोलत राहील. धाडस असेल, तर समोर येऊन गोळ्या घाला.

गुजरातमध्ये दिवाळीच्या काळात वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरावा लागणार नाही ! – गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांची घोषणा

वाहतुकीचे नियम जनतेच्या आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी असतात. ‘ऐन सणांच्या वेळी त्यावरील दंड माफ केल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढू शकते आणि यात लोकांचा जीव जाऊ शकतो’, याचा विचार कोण करणार ?

देहलीमध्ये फटाक्यांची खरेदी-विक्री करणार्‍यावर बंदी

देहली राज्यामध्ये फटाक्यांची निर्मिती, संग्रह आणि विक्री करणार्‍यांना ५ सहस्र रुपयांचा दंड आणि ३ वर्षांपर्यंत कारावास अशी शिक्षा होऊ शकते, अशी माहिती देहलीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिली.

पंजाबमध्ये बंदीवानांना त्यांच्या जोडीदाराशी एकांतात भेटता येणार !

पंजाब सरकारने सांगितले की, ही सुविधा कुख्यात गुंड आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोषींना मिळणार नाही.