‘छत्तीसगड राज्यातील भिलाई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्या जामूल येथील एका गायीवर अत्याचार करून पसार झालेला आरोपी हसन खान याला गोंदिया पोलिसांनी अटक केली. या नराधमाने २७ मे २०२३ च्या रात्री एका गायीवर अत्याचार केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रित झाला आणि तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. घटनेनंतर जामूल येथील विविध सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी यास विरोध करत निदर्शने केली होती, तसेच आरोपीला पकडून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती.’ (२.६.२०२३)