फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे ४२ वर्षांपूर्वी झालेल्या १० जणांच्या हत्येच्या प्रकरणी ९० वर्षांच्या वृद्धाला जन्मठेप !

प्रतिकात्मक चित्र

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) – येथे एका ९० वर्षीय वृद्ध व्यक्तीला ४२ वर्षे जुन्या प्रकरणात जन्मठेप आणि ५५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. वर्ष १९८१ मध्ये १० जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १० जण दोषी आढळले होते. या खटल्याच्या सुनावणीच्या प्रदीर्घ कालावधीत ९ दोषींचा मृत्यू झाला, तर शिक्षा सुनावण्यात आलेला ९० वर्षीय वृद्ध गंगादयाल हे एकमेव जिवंत दोषी होते. वयोमानामुळे गंगादयाल यांना आता उभेही रहाता येत नाही. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस कर्मचारी त्यांना पकडून न्यायालयाबाहेर घेऊन गेले.

संपादकीय भूमिका

उशिरा दिलेला न्याय हा अन्यायच नव्हे का ?