मिशिगन (अमेरिका) राज्यात धार्मिक स्थळाची तोडफोड करणार्‍यावर कठोर शिक्षा करण्याचे विधेयक सादर !

भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी राजीव पुरी

वाशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील मिशिगन राज्यात कोणत्याही धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली, तर त्याला कठोर शिक्षा करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी राजीव पुरी यांनी हे विधेयक सादर केले आहे. रंजीव पुरी यांनी दिवाळी, ईद आदी या सणांच्या वेळी सुटी देण्यासाठीही एक विधेयक मांडले आहे.

१. पुरी यांनी सांगितले की, विधेयक संमत झाले, तर मंदिर, मशीद, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळी तोडफोड किंवा अवमान करण्यात आले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करणारा खटला चालवता येईल.

२. अमेरिकेतील फेडरेशन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ‘एफ्.बी.आय.’च्या एका अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये धर्माच्या संदर्भात १ सहस्र ५ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले होते. ज्यूंच्या विरोधात ३१.९ टक्के, शिखांच्या विरोधात २१.३ तोडफोड करण्यात आल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले होते.

संपादकीय भूमिका 

भारतात हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे होतात, तसेच हिंदूंच्या देवतांचा विविध माध्यमांद्वारे अवमान केला जातो. हे रोखण्यासाठी भारत सरकार कायदा करणार का ?