युगांडामध्ये समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांना फाशी देणारा कायदा संमत

कंपाला (युगांडा) – युगांडामध्ये समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांना जन्मठेप किंवा  फाशी देणारा कायदा संमत करण्यात आला आहे. समलैंगिक संबंधांवर यापूर्वीच या देशात बंदी होती; मात्र आता ते ठेवणार्‍यांना कठोर शिक्षा करणारा हा कायदा संमत करण्यात आला आहे. या कायद्याच्या विरोधात अमेरिकेने प्रतिक्रिया व्यक्त करतांना युगांडामधील अमेरिकेची गुंतवणूक अल्प करण्याची धमकी दिली आहे.