विद्यार्थिनींची नग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणार्‍या पुणे येथील दहावीच्या ३ विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद !

एवढ्या लहान वयात मुलांची अशी मानसिकता असेल, तर पुढे ही मुले कशी निपजतील ? याचा विचारच न केलेला बरा ! अशा विकृतांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे !

शिरूर (पुणे) येथे पोलिसांनी तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप !

तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेच्या अंतर्गत १३ ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण करतांना त्या ठिकाणची कोणत्याही प्रकारची स्वच्छता न करताच ध्वजारोहण करण्यात आले.

मंदिरामध्ये भाविक येतात, मंदिर परिसर आणि मंदिरे स्वच्छ ठेवा !

मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर इतके भव्य आहे; परंतु प्रवेशद्वाराजवळील कचरा उचलला नाही का ? कुणीही असले, तरी स्वच्छता ठेवली पाहिजे, अशी सूचना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर विश्वस्तांना फटकारले.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंद आणि हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन !

उद्या बांगलादेशासारखी स्थिती भारतातही होऊ शकते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मोर्च्याच्या माध्यमातून झालेले संघटन पुढे तसेच ठेवावे !

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन दबावगट सिद्ध करावा ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

या बैठकीला पुणे, पिंपरी-चिंचवड, मंचर, तळेगाव, भोर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी एक होऊन कृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बाह्यवळण रस्ता कामांची मान्यता जिल्हाधिकार्‍यांची अनुमती न घेता दिली

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी परस्पर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यास मान्यता देतांना ‘जिल्हा विकास आराखडा समिती’चे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची अनुमती घेतली नाही.

हडपसर (जिल्हा पुणे) येथे वाहतूक पोलिसाला लाथ मारणार्‍याला अटक

वाहतूक पोलिसांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देत नाहीत का ? वाहतूक पोलिसांसह अन्य पोलिसांवरही आक्रमणे होणे, यातून पोलीस व्यवस्थेचा धाक संपला आहे, असे लक्षात येते.

माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह ४ जणांवर गुन्हा नोंद !

गुन्हा नोंदवण्यासाठी नागरिकांना उपोषण का करावे लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ?

आपल्या देशासमोर असलेल्या विविध संकटांवर असलेला एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

या वेळी त्यांनी ‘राष्ट्रासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देण्याचा आणि जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करू’, असे उपस्थितांनी सांगितले.