अमली पदार्थांचा पुरवठा करणार्या धर्मांधास गुजरात येथून अटक
अमली पदार्थांच्या विरोधात प्रभावी मोहीम राबवून अमली पदार्थांचे संपूर्ण जाळे नष्ट करणे आवश्यक !
अमली पदार्थांच्या विरोधात प्रभावी मोहीम राबवून अमली पदार्थांचे संपूर्ण जाळे नष्ट करणे आवश्यक !
मणिपूर राज्यामध्ये त्यांनी केलेल्या यशस्वी आतंकवादविरोधी अभियानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. मागील २ वर्षांपासून ते मणिपूर येथे आतंकवादविरोधी अभियानामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत.
हिंदुत्वनिष्ठ कार्य करणार्या हिंदूंची फळी उभारण्यामुळे देव, देश आणि धर्म यांचे कार्य अधिक जोमाने होईल, असा विश्वास आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी तत्पर रहावे, याकरता समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्था कायम प्रयत्नशील रहाणार आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्या रहित केल्या आहेत. महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलनाच्या नियंत्रणासाठी अधिकार्यांच्या नेमणुकाही केल्या आहेत.
आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याविषयी अधिवक्ता तौसिफ शेख यांनी तक्रार केली होती.
मेजर शंतनू घाटपांडे हे ५/९ गुरखा रायफल्स यांच्या माध्यमातून सैन्यदलाची सेवा करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारत सरकारने ‘शूरता पुरस्कार सेना मेडल(गॅलंट्री)’ देऊन सन्मानित केले आहे.
पुणे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलामध्ये थाटात शुभारंभ झाला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अभिव्यक्तीस्वातंत्र्यामुळे अनेक गोष्टींसाठी सवलत मिळाली आहे. त्याचा वापर करतांना विवेक आणि तारतम्य पाळायलाच हवे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.
वर्ष २०१३ च्या सर्वेक्षणानुसार शहरातील सर्व टपरी, पथारी आणि हातगाडीधारकांना १५ दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी परवाना द्या; अन्यथा पिंपरी-चिंचवड महापालिकेला टाळे ठोकून कामकाज बंद पाडू, अशी चेतावणी ‘टपरी, हातगाडी पंचायत’चे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे.
कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या सूत्रावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.