पुणे येथे पोलीस निरीक्षकावर टोळक्याचे कोयत्याने आक्रमण !

या आक्रमणात घायाळ झालेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव रत्नदीप गायकवाड असून त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे.

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जनता एन्.आर्.सी. अभियान’ !

मुसलमानांचा जन्मदर हिंदूंच्या चौपट आहे. मुंबईत १० वर्षांनी हिंदू नामशेष झालेले असतील. या जनअसंतुलनावर उपाय म्हणजे जनता एन्.आर्.सी. ! या जनआंदोलनाचा आरंभ महाराष्ट्रातूनच करण्याचे कारण महाराष्ट्राला इतिहास आहे.

गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमासह पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

गणेशोत्सव मंडळांनी आगामी गणेशोत्सव सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

लाभार्थी महिलांची बंद झालेली बँक खाती तात्काळ चालू करावीत ! – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त

लाभार्थी महिलांकडून थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बंद असलेली बँक (अधिकोष) खाती तात्काळ चालू करण्याची सूचना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी शहरातील बँकांच्या अधिकार्‍यांना केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील ७३२ जणांची फसवणूक करणारे कह्यात !

फसवणूक करणार्‍यांची संख्या वाढणे, हे गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे द्योतक !

दहीहंडी उत्सवातील विज्ञापनांना शुल्क सवलत नाही ! – डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त

आगामी गणेशोत्सवासाठी मंडळांकडून उभारण्यात येणार्‍या स्वागत कमानी, कमानींवरील विज्ञापने यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तसेच दहीहंडी उत्सवातील विज्ञापनांना शुल्कात सवलत नसल्याचे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याला माजी नगरसेविकेची मारहाण !

माहिती अधिकाराच्या नावाखाली इतरांना त्रास देणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे, त्याविषयी काय उपाययोजना काढता येतील ? हे प्रशासनाने पहावे. त्याचप्रमाणे मारहाण करणे कितपत योग्य ? हे माजी लोकप्रतिनिधीने पहावे.

थोडक्यात महत्त्वाचे : पुण्याजवळ हेलिकॉप्टर कोसळले !, ‘कोयता टोळी’च्या चोरीचा प्रयत्न फसला

या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सोबतच ३ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व घायाळ झाले असून या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही.

पुणे येथील खडकवासला धरणातून ४ सहस्र १५० क्युसेकने विसर्ग चालू !

धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस पडत असल्याने २४ ऑगस्ट या दिवशी वरसगाव धरणातून ८६२ क्युसेक, पानशेत धरणातून ८४९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील कीर्ती विद्यालयातील क्रीडा शिक्षकाकडून १२ वर्षीय मुलीचे ४ वर्षे लैंगिक शोषण !

शिक्षण क्षेत्राला कलंक असलेले शिक्षक ! अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करायला हवी !