स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम्’चे यंत्र कापून ५ ते ६ लाखांची चोरी !

‘एटीएम्’चे यंत्र कापले जाते, यावरून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्न निर्माण होतो !

पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती !

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे येथे २ दिवसांचे आंतरराष्ट्रीय ज्योतिष संमेलन उत्साहात पार पडले !

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात २ दिवसांचे आंतरराष्ट्रीय ज्योतिष संमेलन झाले. ज्योतिषतज्ञ एच्.एस्. रावत यांच्या हस्ते या संमेलनाचे उ‌द्घाटन झाले. ज्योतिषतज्ञ आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी होते.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आळंदी (पुणे) येथे ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ साजरा होणार !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा जन्मदिवस हा ‘गीताभक्ती दिवस’ म्हणून गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये ८१ यज्ञ, ५१ ग्रंथांचे पारायण, तसेच ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

पुणे येथील जुन्या वाड्यांना ‘झोपडपट्टी’ घोषित करून पुनर्विकास केल्याचा ‘एस्.आर्.ए.’चा अहवाल दडवला !

असा चुकीचा अहवाल का दिला जातो ? त्यातून कुणाचा आर्थिक लाभ होतो ? याचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे !

विविध बँकांमध्ये सहस्रो कोटी रुपयांची ठेव असणारी पिंपरी-चिंचवड महापालिका घेत आहे ५५० कोटी रुपयांचे कर्ज !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध बँकेमध्ये ५ सहस्र कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यावर ८ टक्के दराने व्याज मिळते. असे असतांनाही मोशी रुग्णालय आणि पुणे-मुंबई महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी ५५० कोटी रुपये कर्जाचे प्रस्ताव अधिकोषांतून मागवण्यात आले आहेत.

उच्चशिक्षण संस्थांना ‘वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म’ लागू करण्याचा निर्णय !

राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) देशभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये महत्त्वाचे पालट करण्यात आले आहेत.

बनावट (खोटी) क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद !

राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस भरतीसाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करून ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती झालेल्या वर्धा येथील नवप्रविष्ट पोलीस शिपायाच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

मतदारसूचीतील त्रुटींमुळे ‘पुणे बार असोसिएशन’ची निवडणूक पुढे ढकलली !

अधिवक्त्यांच्या संघटनेच्या निवडणुकीतही गैरप्रकार होणे, हे लज्जास्पद आहे !

पिंपरी (पुणे) येथे ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पा’च्या पडताळणीसाठी खासगी सल्लागार नको !

पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (एस्.टी.पी.) कार्यान्वित आहेत कि नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी खासगी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.