पुण्याजवळ हेलिकॉप्टर कोसळले !
पुणे – जिल्ह्यातील पौडजवळ असलेल्या घोटवडे या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले. खराब हवामान आणि पाऊस यांमुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सोबतच ३ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व घायाळ झाले असून या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही.
‘कोयता टोळी’च्या चोरीचा प्रयत्न फसला
नवी मुंबई – सीवूड येथील शिवदर्शन आणि गजानन गृहनिर्माण वसाहतीत चोरी करण्यासाठी रात्री कोयता टोळी घुसली. रात्री ३ वाजता या टोळीकडून दरोड्याचा प्रयत्न चालू असतांना वसाहतीच्या सुरक्षा रक्षकाच्या हा प्रकार लक्षात आल्याने चोरट्यांना चोरी करता आली नाही. जुलै मासात खारघर येथे चड्डी टोळीने धुमाकूळ घातला होता.
तानसा वाहिनी फुटली
मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणारी १ सहस्र ८०० मि.मी. व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी २३ ऑगस्ट या दिवशी दुपारी पाऊणच्या सुमारास फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रचंड दाबाने फवारे उडून पाणी वाहून गेले. त्यामुळे या परिसरातील किमान १० ते १२ घरांचे छत उडाले, सामान अस्ताव्यस्त झाले, तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अंधेरी ते दादर परिसरातील पाणीपुरवठ्यावर याचा मोठा परिणाम झाला.
संपादकीय भूमिका : वाहिन्यांची पडताळणी वेळोवेळी होत नाही का ?
ठाणे परिसरात चोरी आणि घरफोडी करणारे धर्मांध अटकेत !
ठाणे, २४ ऑगस्ट (वार्ता.) – ठाणे, कळवा, खारीगाव परिसरात चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी महंमद सादीक रिझवान शेख (वय ३५ वर्षे), अहमद रझा अबुबकर सिद्दीकी (वय ३३ वर्षे) यांना अटक केली आहे. या सराईत गुन्हेगारांविरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. (गुन्हेगार वारंवार सुटतात; म्हणून परत गुन्हे करतात ! – संपादक)
संपादकीय भूमिका : गुन्हेगारीत बहुसंख्य धर्मांधच !
मंत्री रक्षा खडसे यांनी काठमांडू येथे घेतली दुर्घटनाग्रस्तांची भेट !
मुंबई – नेपाळ येथे झालेल्या बस दुर्घटनेत जळगावमधील २५ जणांचा मृत्यू झाला, तसेच काही जण घायाळ झाले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नेपाळची राजधानी काठमांडू येथे जाऊन उपचार घेत असलेल्या नागरिकांची भेट घेतली.