पुणे येथील खडकवासला धरणातून ४ सहस्र १५० क्युसेकने विसर्ग चालू !

खडकवासला धरण

पुणे – खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये २३ ऑगस्टपासून पाऊस पडत आहे. चारही धरणे पूर्णपणे भरली असल्याने पडणार्‍या पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये ४ सहस्र १५० क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. खडकवासला धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमध्ये २८.३४ टी.एम्.सी. (दशअब्ज घनफूट) म्हणजे ९७.१८ टक्के पाणीसाठा जमा आहे. धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस पडत असल्याने २४ ऑगस्ट या दिवशी वरसगाव धरणातून ८६२ क्युसेक, पानशेत धरणातून ८४९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.