दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बदलापूर येथील नराधमाचे हातपाय कापून चौरंगा करावा !; भाजपला संपवणे हाच मविआचा कार्यक्रम ! – मुनगंटीवार, वनमंत्री…

महाराजांनी राझांचा पाटील याचे हात पाय कापून जसा चौरंग केला होता, तसेच याविषयी केले पाहिजे, असे मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत व्यक्त केले.

सोलापूरहून गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या धर्मांधाला पुणे येथे अटक !

लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

रक्ताचे नमुने पालटणार्‍या सर्वच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला !

अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, ‘ससून’चे आधुनिक वैद्य अजय तावरे, आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अमर गायकवाड हे आरोपी येरवडा कारागृहात असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

पुणे जिल्ह्यांतील ५०७ शाळाबाह्य मुलांपैकी २८१ मुलांना शाळेत घेतले !

मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी दिली.

आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध !

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थे’कडून त्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.

‘पुणे जिल्हा तलाठी संघटने’च्या लाचखोर जिल्हाध्यक्षांना अटक !

लाचखोरी नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षेसह संबंधिताची सर्व संपत्ती जप्त केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

पुणे येथील गुन्हेगाराला ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी २१ वर्षे सक्तमजुरी !

सराईत गुन्हेगार उच्चाप्पा मंगळूर याला तडीपार केलेले असतांनाही त्याने पुण्यात येऊन ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. न्यायालयाने त्याला २१ वर्षे सक्तमजुरी आणि ७५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पुणे येथे अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार !

अशा घटना पहाता सध्याची पिढी कोणत्या मार्गावर आहे, हे लक्षात येते. या पिढीवर योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

पिंपरी-चिंचवडमधील (पुणे) मोशी कचरा डेपोच्या पाठीमागील गायरान जागेवरील शेकडो झाडे तोडली !

शेकडोंच्या संख्येत झालेल्या वृक्षतोडीचे दायित्व कुणाचे आणि त्यातून झालेली पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार ?

पिंपरीतील ३ रुग्णालयांमध्ये बाँब ठेवल्याचा फसवा ई-मेल !

पथकाला रुग्णालय परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तो ई-मेल फसवा असल्याचे लक्षात आले.