लाभार्थी महिलांची बंद झालेली बँक खाती तात्काळ चालू करावीत ! – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त

पुणे – ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत हस्तांतरित केलेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित करण्यात येऊ नये. लाभार्थी महिलांकडून थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बंद असलेली बँक (अधिकोष) खाती तात्काळ चालू करण्याची सूचना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी शहरातील बँकांच्या अधिकार्‍यांना केली आहे.