पुणे येथे ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयासंदर्भात जागृती करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन !
पुणे – येथील जिज्ञासू श्री. राजेंद्रजी लुंकड यांच्या धर्मपत्नी सौ. कमल लुंकड यांच्या संपर्कातील महिलांसाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयासंदर्भात जागृती करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थित महिलांना याविषयी अवगत केले. यामध्ये हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय ?, त्या माध्यमातून होत असलेला आर्थिक जिहाद, तसेच हलालच्या माध्यमातून धर्मांध विचारसरणी असलेल्या संघटनांकडून भारतातील व्यापार आणि अर्थव्यवस्था यांच्यामध्ये हस्तक्षेप करून देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे जागतिक स्तरावरील षड्यंत्र कसे चालू आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील धोके आणि त्यामध्ये हिंदूंची भूमिका कशी असायला हवी ? या सूत्रांविषयी विस्तृत माहिती देऊन महिलांचे प्रबोधन केले.
‘आम्हाला हा विषय आणि याचे गांभीर्य या व्याख्यानाच्या माध्यमातून पहिल्यांदाच समजले’, असे सर्व धर्मप्रेमी महिलांनी सांगितले. ‘यापूर्वी आम्हाला यासंदर्भात काहीच माहिती नव्हती. यापुढे आम्ही बाजारातून कोणतीही वस्तू घेतांना ती हलाल प्रमाणित नाही ना ? याची निश्चिती करूनच घेऊ. हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालू. संपर्कातील अधिकाधिक जणांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू’, असे सर्वांनी उत्स्फूर्तपणे सांगून तसा निर्धार केला.
क्षणचित्र
या वेळी काही महिलांनी या विषयासंदर्भात त्यांचे विचार आणि त्यांना आलेले अनुभवही स्वतःहून सांगितले.
विशेष
१. या वेळी उपस्थित महिलांना हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून चालू असलेला धर्मशिक्षणवर्ग, स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि प्रथमोपचारवर्ग या उपक्रमांचीही माहिती देण्यात आली. त्या वेळी काही महिलांनी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण शिकण्याची इच्छा व्यक्त केली.
२. चर्चासत्राच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.