पुणे येथे २३३ कोटींची खोटी देयके देणार्‍या धर्मांध व्यापार्‍यास अटक !

वस्तू आणि सेवा कर विभागाची कारवाई

अल्पसंख्य म्हणवणारे धर्मांध फसवणूक, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार अशा सर्वच गैरप्रकारांत आघाडीवर असणे, हे देशासाठी घातक आहे. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – वस्तू आणि सेवा कर विभागाने (जी.एस्.टी.) २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी आफताफ रेहमानी या व्यापार्‍यास अटक केली आहे. रेहमानी याने २३३ कोटी रुपयांची खोटी देयके दिल्याचे उघडकीस झाले असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राज्य कर अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आफताफ रेहमानी याच्या ‘मे. अर्श स्टील कॉर्पोरेशन’ या आस्थापनाने ‘वस्तू आणि सेवा कर कायदा २०१७’च्या अंतर्गत नोंदणी दाखला घेतला. या आस्थापनाच्या माध्यमातून रेहमानी याने २०० कोटी रुपये रकमेची केवळ देयके देऊन ४२ कोटी ९५ लाख रुपयांचा आय.टी.सी. (इनपूट टॅक्स क्रेडिट) पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये, यासाठी बोगस आस्थापनाकडून कोणत्याही वस्तू आणि सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याविना दाखवलेल्या बोगस खरेदी देयकातून अनुमाने २७ कोटी ७ लाख रुपयांचा परतावा प्राप्त करून घेतला. हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर राज्य वस्तू आणि सेवाकर विभागाकडून गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली.