सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील कामकाज संपामुळे ठप्प !

पुणे – राज्यातील विद्यापिठांतील महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापिठीय सेवक संयुक्त कृती समितीने २ दिवसांपूर्वी ‘बेमुदत’ संप पुकारला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे डॉ. सुनील धिवार यांनी दिली. या संपामुळे विद्यापिठाच्या कामकाजावर परिणाम होतांना दिसून येत आहे. केवळ शासनाच्या पक्षपाती भूमिकेमुळे विद्यापिठीय/महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मागण्यांची नोंद घेतली गेली नाही, असे सेवक संयुक्त कृती समितीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.