खेड-शिवापूर (पुणे) टोलनाका परिसरातून एका चारचाकी गाडीतून ५ कोटी रुपये जप्त !

निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वत्र होणारे अपप्रकार व्यवस्थेचे अपयश दर्शवतात ! प्रलोभने देऊन मतदान होत असेल, तर लोकशाही कशी टिकणार ?

भाजपच्या वतीने चिंचवडमधून शंकर जगताप, तर भोसरीतून महेश लांडगे यांना उमेदवारी !

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची पहिली ९९ उमेदवारांची सूची भारतीय जनता पक्षाकडून घोषित करण्यात आली आहे.

खांबोली (पुणे) तलावात २ जणांचा बुडून मृत्यू !

मुळशी तालुक्यातील खांबोली तलाव परिसरात मित्र-मैत्रिणींसमवेत फिरायला गेलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तलावात पोहोण्यासाठी उतरल्यानंतर दोघेही गाळामध्ये अडकले आणि त्यानंतर दोघेजणही बुडाले.

पुणे येथील आमदार रवींद्र धंगेकर यांच्या ‘हिंदमाता प्रतिष्ठान’ विरोधात गुन्हा नोंद !

आमदार रवींद्र धंगेकर यांनी ‘हिंदमाता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून दिवाळीनिमित्त सुगंधी उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप केले आहे.

पुणे येथील ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानका’ला आग !

नुकतेच उद्घाटन झालेल्या ‘महात्मा फुले मंडई ‘मेट्रो’ स्थानका’ला आग लागल्याची घटना घडली आहे. २० ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही आग लागल्याचे समजते. आगीची माहिती मिळताच अग्नीशमनदलाच्या ५ गाड्यांनी आग नियंत्रणात आणली.

दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावर होणार्‍या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना !

दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावरून १ दिवसात अनुमाने दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात जाणार्‍या विशेषतः दानापूर, गोरखपूर, लखनऊ आदी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते.

पुणे येथे भ्रमणभाष चोरणार्‍या टोळीला अटक !

सय्यद शेख, अखिल गोदावरी, लोकेश पुजारी आणि पप्पू वैश्य अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १४ भ्रमणभाष हस्तगत केले आहेत.

पाणीपट्टी कर न भरल्याने मुळशी प्रादेशिक योजनेतील २१ ग्रामपंचायतींचे पाणी बंद !

महावितरणने गेल्या २ दिवसांपासून या योजनेचा विद्युत् पुरवठा खंडित केल्याने मुळशी प्रादेशिकचा सर्व २१ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. अनेक ग्रामस्थांना पिण्याचे पाणी दुकांनामधून विकत घ्यावे लागत आहे.

गोदामातून २८० भ्रमणसंगणकांची चोरी

पोलिसांनी आतापर्यंत यातील ३ आरोपींना अटक केली असून १ आरोपी पसार आहे. भ्रमणसंगणकासह सर्व ऐवजाचे मूल्य १ कोटी १ लाख रुपये आहे.

कोंढवा येथे वाहतूककोंडी सोडवणार्‍या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की !

कायद्याचे भय न उरल्याने समाजात अशा घटना वारंवार घडत आहेत, हे दुर्दैवी !