‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२२’ गुढीपाडव्यापासून प्रारंभ !

गुढीपाडवा म्हणजेच २ एप्रिलपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२२’ प्रारंभ झाला असून १३ एप्रिलअखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उरलेल्या अडीच वर्षांत तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

आजही याच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने एक शहर आहे. ‘त्या औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे’, असे कुठल्याही राज्यकर्त्याला वाटत नाही, हे मोठे दुर्दैव आहे.

(म्हणे) ‘नागालँडमध्ये चर्चमुळे नागा समाजाचा ‘विकास’ झाल्याचा आनंद !’ – व्हॅटिकन

ख्रिस्त्यांचा पूर्वेतिहास पहाता त्यांच्या तथाकथित सामाजिक कार्यामागे ‘हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा छुपा हेतू असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे ! स्वत: पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१५ मध्ये अशा आशयाचे ट्वीटही प्रसारित केले होते.

‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’च्या वतीने पन्हाळगडावरील तटबंदी आणि बुरुज यांची स्वच्छता !

‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’ गेल्या ३० वर्षांपासून इतिहासाच्या क्षेत्रात दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. ‘शिवराष्ट्र’चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मोहिमेचे महत्त्व विशद केले. मोहीम प्रमुख राजेंद्र पोवार यांनी ‘संवर्धन मोहिमे’विषयी मार्गदर्शन केले.

हुकमिल लेन (मुंबई) येथील श्री शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

शिवजयंतीच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या हुकमिल लेन (मुंबई) येथील श्री शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! सर्व उत्सव मंडळांनी यातून बोध घ्यावा !

शिक्षणाचे भगवेकरण होण्यात चूक काय ? – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

आमच्यावर शिक्षणाचे भगवेकरण केल्याचा आरोप होत आहे; पण मग तसे होण्यात काय चूक आहे ? असा प्रश्न उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला. ते हरिद्वार येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

(म्हणे) ‘हिजाबविषयी निर्णय देणार्‍या न्यायाधिशांची हत्या झाल्यास त्याला तेच उत्तरदायी असतील !’

न्यायालयाचा निकाल पटला नाही; म्हणून काश्मीरमध्ये वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदु न्यायाधिशांची हत्या केली. आताही इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत !

स्वरक्षणासाठी प्रत्येक महिलेने धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – कु. शीतल चव्हाण, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

त्रिवेणी शिक्षण संस्थान आणि ‘युनायटेड नारी शक्ती’ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलुंड येथे आयोजित एका कार्यक्रमात कु. शीतल चव्हाण बोलत होत्या.

‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमावर सामाजिक माध्यमांतून टीकेची झोड !

‘द काश्मीर फाइल्स’ या काश्मीरमधील हिंदूंवर आतंकवाद्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांवर आधारित चित्रपटाला या कार्यक्रमांत प्रसिद्धी देण्यास नकार दिला. त्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र आयोजित करणार ! – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आणि तरुणी यांना आत्मरक्षण करता येण्यासाठी प्रशिक्षण केंद्र आयोजित करण्याची योजना बनवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात दिली.