शिक्षणाचे भगवेकरण होण्यात चूक काय ? – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

नवी देहली – आमच्यावर शिक्षणाचे भगवेकरण केल्याचा आरोप होत आहे; पण मग तसे होण्यात काय चूक आहे ? असा प्रश्न उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला. ते हरिद्वार येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘आपला वारसा आणि संस्कृती यांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपण आपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. ज्ञानाचा खजिना असलेले आपले धर्मग्रंथ जाणून घेण्यासाठी आपण संस्कृत शिकले पाहिजे.’’