समाजाला धर्मशिक्षण मिळण्यासाठी कृतीशील व्हा ! – सौ. कांचन शर्मा, हिंदु जनजागृती समिती

पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षापद्धत आणि एकत्र कुटुंबपद्धत होती. त्यातून धर्मशिक्षण मिळत असे. त्यातून हिंदूंचा धर्माभिमानही वृद्धींगत होत असे; पण आता धर्मशिक्षणच मिळत नाही आणि मुलेही कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षण घेतात.

अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांचे २ सहस्र महिलांसमवेत हनुमान चालिसाचे पठण !

येथील खासदार सौ. नवनीत राणा यांनी २ सहस्र महिलांच्या समवेत १२ एप्रिल या दिवशी रवी नगर परिसरात हनुमान चालिसाचे पठण केले. तेथील संकटमोचन हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त नामजपांचे ध्वनिमुद्रण सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या मंगलहस्ते लोकार्पण !

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ या नामजपांच्या ध्वनिमुद्रणाचे लोकार्पण डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या मंगलहस्ते १५ एप्रिल या दिवशी येथे आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले.

सातारा येथे विविध मंदिरांत हिंदूंकडून साकडे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

खटाव तालुक्यातील खातवळ येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी  साकडे घालण्यात आले. ३० हून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा ७५ वा संजीवन समाधी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

पालखी मिरवणुकीत सद्गुरु श्री शंकर महाराज यांची मूर्ती, धनगरी ढोल, लेझीम यांसह विठ्ठल-रुक्मिणी आणि साईबाबा यांचे पात्र साकारण्यात आले होते.

पुणे येथील पवळे चौकातील शिवलिंगपूजन कार्यक्रमाविषयी नोंदवलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत ! – पतित पावन संघटना

पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार भगवे झेंडे, ध्वनीक्षेपक, माईक, श्रद्धांजली फ्लेक्स काढण्यात आले. कीर्तन, भजन, महाआरती न करण्याच्या अटींचे पालन करूनही पोलिसांनी गुन्हे नोंद केले.

मंदिरांच्या माध्यमातूनच हिंदूंचे संघटन होते आणि त्यांना धर्मकार्य करण्याची शक्ती मिळते ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देवस्थान भूमी परत मिळवण्यासाठीच्या लढ्याची माहिती देण्याच्या हेतूने आयोजित कार्यक्रम !

प्रत्येकाने दिवसातील १५ मिनिटे वेळ काढून राष्ट्र-धर्माच्या स्थितीविषयी चिंतन-मनन केले पाहिजे ! – शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, काशी सुमेरू पीठ

भारताने नेहमीच विश्वकल्याणाची भूमिका घेतली आहे. तमिळी हिंदूंची हत्या करणार्‍या श्रीलंकेत खाण्यासाठी अन्न नाही, अशी स्थिती आहे. भारताचा तिरस्कार करणार्‍या पाकिस्तानची स्थिती काय आहे, हे आपण पहात आहोत.

भेदभाव आणि भ्रष्टाचार हे मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम ! – पंतप्रधान

काही पक्षांनी देशात अनेक दशके मतपेटीचे राजकारण केले. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे याच मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘महाराष्ट्र राज्य गवंडी समाज सेवा संघा’च्या अध्यक्षपदी अविनाश आळंदीकर यांची नियुक्ती !

३ एप्रिल या दिवशी पंढरपूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील ज्येष्ठ समाजबांधव मनोज राजापूरे होते.