दुर्धर आजाराने त्रस्त असणार्‍या महिलांना मिळणार आर्थिक साहाय्य !

चिपळूण नगर परिषद हद्दीतील दुर्धर आजाराने त्रस्त असणार्‍या महिलांना आर्थिक साहाय्य देण्याची योजना येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने राबवली जात आहे.

मुंबईमध्‍ये मशिदीवरील भोंग्‍यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

मशिदीवरील भोंग्‍यामुळे होणार्‍या त्रासाच्‍या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्‍याप्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्‍तांना न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचा आदेश दिला.

नागपूर येथील एन्.सी.आय. म्‍हणजे मध्‍य भारतातील कर्करोगाच्‍या उपचाराचे आरोग्‍य मंदिर ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्‍या दुर्धर व्‍याधीने ग्रस्‍त रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्‍था विदर्भासह मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्‍य भारतातील राज्‍यांसाठी आरोग्‍य मंदिर ठरत आहे.असे ते म्‍हणाले.

सातारा जिल्‍ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्‍यू !

जिल्‍ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. गत २४ घंट्यांत एका रुग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यामुळे धोका वाढला असून आरोग्‍य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी कोरोनाविषयी काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

पाटण (जिल्हा सातारा) येथे शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा ?

शासकीय रुग्णालयातच पुरेशी औषधे उपलब्ध नसणे, हे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार आहे. याला उत्तरदायी असणाऱ्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! औषधांचा तुटवडा आहे की, औषधे रुग्णांना न देता त्याचा अन्यत्र उपयोग केला जातो, हेही पहायला हवे !

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘लाइफलाईन’ आस्थापन यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.

रुग्णांना लुबाडल्याप्रकरणी शासनाच्या जनआरोग्य योजनेतून ६४१ रुग्णालयांना बाहेरचा रस्ता !

गरिबांसाठी शासनाने केलेल्या योजनांचा अपलाभ उठवून पैसे उकळणारी रुग्णालये आणि त्यांचे पदाधिकारी समाजद्रोहीच !

अपंग प्रमाणपत्राकरता लाच घेणार्‍या फिजिओथेरपिस्टच्या विरुद्ध गुन्हा नोंद !

अपंग असल्याचे प्रमाणपत्र देण्याकरता ६० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील फिजिओथेरपिस्ट पवन शिरसाठ यांना लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ !

राज्यासमवेत शहरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतांनाच संशयित रुग्णांची कोरोना चाचणी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र ८२४ रुग्ण आढळले

देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र रुग्ण आढळले असून मागील १८४ दिवसांतील हा उच्चांक आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ सहस्र ३८९ एवढी झाली आहे.