अपंग प्रमाणपत्राकरता लाच घेणार्‍या फिजिओथेरपिस्टच्या विरुद्ध गुन्हा नोंद !

‘ससून सर्वोपचार रुग्णालय ( संग्रहीत छायाचित्र )

पुणे – अपंग असल्याचे प्रमाणपत्र देण्याकरता ६० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील फिजिओथेरपिस्ट पवन शिरसाठ यांना लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या वैद्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ. शिरसाठ हे ससून रुग्णालयामध्ये ‘अस्थिव्यंगोपचार विभागा’मध्ये फिजिओथेरपिस्ट (शारीरिक उपचार करणारे) म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार हे सरकारी सेवेत कार्यरत असून त्यांनी अपंग प्रमाणपत्राकरता रुग्णालयामध्ये अर्ज केला होता.

संपादकीय भूमिका

लाचखोरी मुळापासून नष्ट होण्यासाठी लाचखोरांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !