सातारा जिल्ह्यात कोरोनाचे २२ रुग्ण !

जिल्ह्यात आतापर्यंत २२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे, तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

देशात २४ घंट्यांत आढळले कोरोनाचे ३ सहस्र नवीन रुग्ण !

कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १३ सहस्र ५०९ झाली आहे. २९ मार्च या दिवसात कोरोनाबाधित ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्‍यात एका दिवसात कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीने वाढ !

महाराष्‍ट्रात २७ मार्च या दिवशी कोरोनाबाधित नवीन २०५ रुग्‍ण आढळले; मात्र २८ मार्च या दिवशी ४५० नवीन रुग्‍ण आढळले. म्‍हणजे एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

मधुमेह – उच्च रक्तदाबासाठी एकच औषधाला भारत सरकारचे ‘पेटंट’  

मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा रुग्णांची सातत्याने होत असलेली वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी’ महाविद्यालयातील प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी अशा रुग्णांसाठी एकच औषध निर्माण केले आहे.

रुग्णालयातील सेवा सुरळीत ठेवण्यासाठी शासन रोजंदारीवर कर्मचारी घेणार !

राज्यात ठिकठिकाणी आधुनिक वैद्य, परिचारिका, तसेच आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने रुग्ण सेवेत अडथळे येत आहेत. शस्त्रक्रिया रखडलेल्या असून रुग्णांवर उपचार करतांनाही सरकारी रुग्णालयातील व्यवस्था तोकडी पडू लागली आहे.

जेनेरिक औषधांमुळे देशातील रुग्णांचे २० सहस्र  कोटी रुपये वाचले ! – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

‘पाचवा जनऔषधी दिवस’ १२ मार्च या दिवशी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील आय.एम्.ए. हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

‘एच्३एन्२ इन्फ्लूएंझा’मुळे २ जणांचा मृत्यू

देशात आतापर्यंत या तापाचे ९० रुग्ण आढळून आले आहेत. हरियाणा आणि कर्नाटक येथे हे मृत्यू झाले आहेत.

‘एच्‌३एन्‌२’ फ्‍लूपासून सतर्कतेची चेतावणी

‘एच्‌३एन्‌२ ’ फ्‍लू गेल्‍या दोन-तीन मासांपासून मोठ्या प्रमाणावर लोकांच्‍या आरोग्‍यासाठी धोका ठरला आहे, असे ‘आयसीएमआर’च्या शास्‍त्रज्ञांनी म्‍हटले आहे.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांचा पोलिसांकडून गौरव

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान गेल्या १२ वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका सेवा देत आहे. संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका असून महाराष्ट्राच्या हद्दीतील विविध महामार्गावर अविरत सेवा बजावीत आहे. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.

पुणे येथे लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर ‘ ओडिनो’ या विषाणूची लागण !

‘ओडिनो’हा आजार जीवघेणा नसून आजाराची लक्षणे पूर्णत: निघून जाण्‍यास किमान ७ दिवसांचा अवधी लागतो. हा विषाणू सामान्‍यत: संक्रमित व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात आल्‍याने पसरत आहे.