कोरोना लसीकरण आणि चाचणी बंधनकारक केल्यामुळे नगर येथील चाचणी अन् लसीकरण केंद्रावर संबंधितांची गर्दी
आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी आणि लसीकरण करून घेण्यासाठी सरकारी रुग्णालये, सेवाभावी संस्थांच्या वतीने चालवण्यात येणारी केंद्र येथे गर्दी आहे.
आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी आणि लसीकरण करून घेण्यासाठी सरकारी रुग्णालये, सेवाभावी संस्थांच्या वतीने चालवण्यात येणारी केंद्र येथे गर्दी आहे.
व्यापार्यांनी ‘या दळणवळण बंदीला आमचा विरोध असून पोलिसांना गुन्हे नोंद करायचे असतील, तर त्यांनी ते करावेत; मात्र आम्ही आमची दुकाने उघडणार’, असा पवित्रा घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एम्.बी.बी.एस्. डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असणे गंभीर आहे.
बच्चू कडू यांनी जिल्हा रुग्णालयातील खानावळीला भेट दिली. या वेळी कडू यांना खानावळीतील डाळीच्या दैनंदिन वापरात अपहार होत असल्याचे लक्षात आले आणि त्यातूनच त्यांनी स्वयंपाक्याच्या कानाखाली लगावली…..
पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या आपत्काळात दायित्वशून्यपणे वागणारे असे नागरिक भीषण आपत्काळात काय करतील ?
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कोरोना रुग्णांसाठी शासकीय यंत्रणा लवकरात लवकर चालू करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत, या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ६ एप्रिल या दिवशी दिले.
महाराष्ट्राला कोरोनावरील १ कोटी ६ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८८ लाख डोसचा उपयोग करण्यात आला आहे. डोस वाया जाण्याचे प्रमाण ३ टक्के आहे. ५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ सहस्र ३३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
संसर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे; मात्र १ सहस्र सिलेंडरची मागणी असतांना ७०० सिलेंडरचा पुरवठा होत आहे.