शिक्षित कि अशिक्षित ?
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकूण २ लक्ष ४१ सहस्र ९०८ एवढे मतदान झाले. त्यापैकी २३ सहस्र ९२ मते अवैध होती, म्हणजेच झालेल्या एकूण मतदानाच्या जवळपास १० टक्के मतदान अवैध ठरले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकूण २ लक्ष ४१ सहस्र ९०८ एवढे मतदान झाले. त्यापैकी २३ सहस्र ९२ मते अवैध होती, म्हणजेच झालेल्या एकूण मतदानाच्या जवळपास १० टक्के मतदान अवैध ठरले.
उंच इमारतीवरून किंवा कड्यावरून उड्या मारण्याची शक्ती मिळत असल्याचे दाखवणारे एखादे शीतपेय किंवा एक कापड फिरवल्यावर फरशी चकाचक चमकत असल्याचे दाखवणारे एखादे स्वच्छतेचे रसायन असो ! उत्पादनाचे अवास्तव ‘मार्केटिंग’ करण्याचा हा प्रकार कोरोनोच्या काळात अजून वाढलेला दिसून येत आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात आल्यानंतर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची नियोजनशून्यता समोर आली. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची आर्थिक लुबाडणूक चालू आहे. देवतेचे दर्शन ही विकत घेण्याची गोष्ट नसल्याने ‘पेड दर्शना’ला भाविकांचा कायम विरोधच राहिला आहे !
प्रदूषणाची समस्या शहरी भागांमध्येच अधिक आहे, असा समज होता; पण ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे.
निवृत्तीवेतन घेणार्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने सर्व प्रकरणांची चौकशी करून निवृत्तीवेतन धारकांना न्याय द्यावा आणि कामचुकारपणा करणार्यांना कठोर शिक्षा द्यावी, ही अपेक्षा !
उठल्याबरोबर लहान मुलांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ? हे मुलांना समजत नसले, तरी पालकांना समजत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
धर्मांधांची आक्रमणे, देशांतर्गत युद्ध, महिलांवरील अत्याचार यांविरुद्ध मोहीम राबवणे आवश्यक असतांना सध्याची पत्रकारिता जनतेला दिशाहीन करत आहे. देश पारतंत्र्यात असतांना नागरिकांना योग्य दिशा देणार्या लोकमान्य टिळकांची पत्रकारिता अभ्यासल्यास वृत्तपत्रांना पत्रकारिता कशी असावी, हे निश्चित लक्षात येईल.
गत ५० वर्षांपासून सातारावासियांचे ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४’शी जिव्हाळ्याचे नाते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या रस्त्याचे विशेष महत्त्व सातारकर अनुभवत आहेत.
दळणवळण बंदीच्या काळातही हिंदु जनजागृती समिती ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण वर्ग, युवती शौर्यजागृती व्याख्याने आयोजित करते. त्याचा महिला-युवती यांनी लाभ घ्यायला हवा. महिलांनी प्रशिक्षण शिकून स्वतःचे रक्षण स्वतःच करणे, ही काळाची आवश्यकता आहे !
पद आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी शिक्षण समित्या किंवा मंडळे स्थापन करायची, त्यामध्ये निवडून न आलेल्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना स्थान मिळवून द्यायचे, इतकेच काय ते या शिक्षण समित्या अथवा मंडळांचे सध्याचे स्वरूप झाले आहे.