नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असणारे प्रा. साईबाबा निर्दाेष !

शहरी नक्षलवादी आणि देहली विद्यापिठाचे तत्कालीन प्राध्यापक जी. एन्. साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दाेष घोषित करण्यात आले. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलात नक्षलवाद्यांचे साहित्य मिळाले !

कुरखेडा भागातील मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके आणि अन्य साहित्य असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर विशेष अभियान पथक गडचिरोली आणि बी.डी.डी.एस्. पथकाचे जवान यांनी कारवाई करून ते शोधून काढले आहे.

 बिहार नक्षलवादमुक्त, झारखंडमध्येही लढा शेवटच्या टप्प्यात ! – केंद्रीय राखीव पोलीस दल

नक्षलवादी काही ठरावीक काळानंतर पुनःपुन्हा क्रियाशील होऊन पोलीस आणि सामान्य जनता यांना लक्ष्य करतात, हा इतिहास आहे. त्यामुळे तो समूळ नष्ट होईपर्यंत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

१५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला नालासोपारा येथून अटक !

नक्षलवादाचा पूर्ण बीमोड होईपर्यंत प्रयत्न व्हायला हवेत !

गडचिरोली येथे स्फोटकांचे साहित्य सापडल्याच्या प्रकरणातील फरार नक्षलसमर्थकाला ६ मासांनंतर अटक

पोलिसांनी अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा गावातून मोठ्या प्रमाणात स्फोटके बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला गडचिरोली पोलिसांनी ६ मासांनंतर तमिळनाडूतील सालेम येथून अटक केली.

शहरी नक्षलवाद्यांच्या निधीचे अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण होणार !

कोरेगाव भीमा दंगल आणि एल्गार परिषदेतील प्रक्षोभक वक्तव्य यांप्रकरणी अटकेत असलेले अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांच्या आर्थिक व्यवहारांचे अन्वेषण करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने मागितलेली अनुमती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने दिली.

शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

भीमा कोरेगाव प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील आरोपी आणि शहरी नक्षलवादी ८४ वर्षीय वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केला.

नक्षलवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक ! – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे – आतापर्यंत नक्षलवाद का समाप्त झाला नाही ?’

राज्यात ५ वर्षांत नक्षलवाद्यांच्या भरतीचे प्रमाण उणावले !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश आहे. संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !

नौपाडा (ओडिशा) येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद संपुष्टात न आणू शकणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !