शस्त्रसाठाही जप्त
अशा राष्ट्रघातक्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
रांची (झारखंड) – नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवल्याच्या प्रकरणी सीमा सुरक्षा दलाचा निवृत्त सैनिक अरुण कुमार सिंह आणि त्याच्या ३ साथीदारांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर अटकेची ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
A joint team of Bihar and Jharkhand Special Task Force arrested a former Border Security Force (BSF) jawan and recovered 919 live cartridges of Insas, SLR and 9mm pistol from him on Wednesday
(@avinashdnr reports)https://t.co/7sAnUbn3e0
— Hindustan Times (@htTweets) November 18, 2021
अलीकडेच अटक करण्यात आलेला केंद्रीय राखीव पोलीस दलाचा सैनिक अविनाश आणि त्याचे इतर २ साथीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या चौघांना अटक करण्यात आली आहे. नक्षलवादी आणि गुन्हेगारी टोळ्या यांना विकली जाणारी अनेक शस्त्रे देशाच्या सशस्त्र दलांची असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.