कोरेगाव-भीमा दंगल प्रकरण
मुंबई – कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अधिवक्त्या सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला. या प्रकरणातील अन्य ८ आरोपींचा जामीनअर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला आहे. १ डिसेंबर या दिवशी न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.
मुंबई: कोरेगाव-भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील आरोपी वकील सुधा भारद्वाज यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर pic.twitter.com/ZyXFUIDWvd
— Maharashtra Times (@mataonline) December 1, 2021
आरोपींना कोठडीचा आदेश देणारे आणि आरोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला मुदतवाढीचा आदेश देणारे पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, हे अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायाधीश नव्हते. त्यामुळे त्यांचे आदेश अवैध ठरतात, हा भारद्वाज यांच्या अधिवक्त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने भारद्वाज यांना जामीन संमत केला. सुधा भारद्वाज या २८ ऑगस्ट २०१८ पासून अटकेत होत्या.