महाराष्ट्र पोलिसांची नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई !
छत्तीसगड – महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ कोटगुल-ग्यारापत्ती जंगलाच्या परिसरात १३ नोव्हेंबरच्या रात्री महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार झाले. मिलिंद तेलतुंबडे याला पकडण्यासाठी शासनाने ५० लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते. नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाईसाठी खास सिद्ध करण्यात आलेल्या ‘सी-६०’ या महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.
मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवादी झाले होते ठार; २० पुरुषांसह ६ महिला नक्षलवाद्यांचा समावेशhttps://t.co/KrvCnbHAgK
— Maharashtra Times (@mataonline) November 14, 2021
मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य होता. महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या धडक कारवाईविषयी समाजातील सर्वच स्तरांवरून पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.