नक्षलवाद्यांकडून शोधाशोध चालू
गडचिरोली – महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाने १४ नोव्हेंबर या दिवशी केलेल्या धडक कारवाईत मारला गेलेल्या मिलिंद तेलतुंबडे या कुख्यात नक्षलवाद्याने चळवळीचा पैसा घनदाट अरण्यातील भूमीत गाडला असल्याचे समोर आले आहे. मिलिंद तेलतुंबडे याच्याकडे बरेच अधिकार होते, तसेच पैशांचे व्यवहारही त्याच्याकडेच होते. त्याच्या मृत्यूनंतर ‘चळवळ कशी चालवायची ?’, असा प्रश्न नक्षलवाद्यांना पडला असून त्यांनी या पैशांची शोधाशोध चालू केली आहे.
नक्सली मरा, खाने के वांदे भी कर गया… जंगलों में शुरू हुई खोजबीनhttps://t.co/gobEf5uITg#MilindTeltumbde #naxal #GadchiroliEncounter #AntiNaxal #LWE @DGPMaharashtra @maharashtra_hmo #HindusthanPost
— Hindusthan Post (@HindusthanPostH) November 16, 2021
त्याने चळवळीचे कोट्यवधी रुपये भूमीच्या खाली गाडून ठेवल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली आहे; मात्र हे ठिकाण घनदाट अरण्यात नेमके कुठे आहे ?, ते नक्षलवाद्यांना ठाऊक नाही. पैसा नेमका किती आहे ?, याचाही अंदाज नाही. हा पैसा जर सापडला नाही, तर नक्षलवादी चळवळीवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.