दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डोंबिवली येथे तरुणाला मारहाण करणारे ३-४ जण अटकेत !; मालकाला गुंगीचे औषध देऊन चोरी करणार्‍या दोघांना अटक !

डोंबिवली येथे तरुणाला मारहाण करणारे ३-४ जण अटकेत ! डोंबिवली – मद्यपान केलेल्या ८ ते १० जणांनी एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी ३ ते ४ जणांना अटक केली आहे; मात्र मुख्य आरोपी मोकाट आहे. त्याच्याकडून मुलावर पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता असल्याने त्याच्या वडिलांनी तक्रार … Read more

नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादू नये ! – आमदार गणेश नाईक, भाजप

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर येत्या काही दिवसांत २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नवी मुंबईकरांवर कोणताही करवाढ नये, अशी सूचना भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाचा विभाग अधिकार्‍यांना घेराव !

‘अनधिकृत मशिदीवर कारवाई करा’, हे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना का सांगावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? या प्रकरणात निष्क्रीय रहाणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !

तुर्भे येथील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी शिवसेनेकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा !

वेश्या व्यवसायासारख्या गंभीर सामाजिक समस्या न सोडवणारे प्रशासन जनहिताचे निर्णय कसे घेणार ?

अनधिकृत मदरशावर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करणार ! – सकल हिंदु समाज

अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याविषयी प्रशासनाला सांगावे का लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

नवी मुंबई महानगरपालिका अग्नीशमन केंद्रात जुगार खेळणारे ५ कर्मचारी निलंबित !

ते जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. याची नोंद घेत प्रशासन विभागाने संबंधित कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.

वाशी-तुर्भे येथील पदपथांसह रस्‍त्‍यांवर वाहने दुरुस्‍ती आणि विक्री यांमुळे पादचारी त्रस्‍त !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या वाशी आणि तुर्भे विभाग कार्यालयांच्‍या कार्यक्षेत्रात पदपथ अन् रस्‍ता यांवर दुचाकी, रिक्‍शा, चारचाकी यांच्‍या दुरुस्‍ती-विक्रीचा व्‍यवसाय चालू आहे. यामुळे पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

नवी मुंबईची पहिली मेट्रो आजपासून धावणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते या मेट्रोच्‍या मार्गिकेचे उद़्‍घाटन करण्‍यात येणार होते; पण आता मुख्‍यमंत्री शिंदे यांच्‍या आदेशानंतर ही चालू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. 

नवी मुंबईसह पनवेल महापालिकेच्या कर्मचार्‍यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान घोषित !

नवी मुंबई महापालिकेतील करार आणि तात्पुरत्या स्वरूपातील ४ सहस्र ५९९ कर्मचार्‍यांना २४ सहस्र रुपये, तर आशासेविका यांना १४ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

हवा प्रदूषित करणार्‍या बांधकाम विकासकांवर महापालिकेकडून कारवाई !

महापालिकेने धूळशमन यंत्राद्वारे (‘एअर प्युरिफाय मोबाईल व्हॅन’) हवेतील धुळीचे प्रमाण अल्प करण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच काही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत