बनावट कागदपत्रे वापरून पिंपरी पालिकेची फसवणूक करणार्‍या ठेकेदारांचे रॅकेट उघडकीस !

येथील पालिकेची विकासकामे करणार्‍या ठेकेदारांनी अधिकार्‍यांच्या साथीने बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन कोट्यवधी रुपयांची कामे मिळवली असल्याचे रॅकेट उघडकीस झाले आहे. विशेषत: स्थापत्य विभागातील कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा सर्रास वापर झाल्याचे समोर आले आहे.

६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती बघायला मिळते ! – नीलेश राणे, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी १२ डिसेंबर या दिवशी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला होता.

केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकर्‍यांनी फेटाळला

१४ डिसेंबरला एकदिवसीय उपोषण आणि देशभरात धरणे आंदोलन करणार

महाराष्ट्रात ‘भारत बंद’ पाळून ठिकठिकाणी आंदोलन आणि फेरी यांचे आयोजन

कृषी विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रात आयोजलेला ‘भारत बंद’ चा तपशील येथे देत आहोत.

राहुल गांधी यांना समजून घेण्यास शरद पवार न्यून पडले ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

राहुल गांधी यांना पक्षात स्वीकारार्हता असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे.=बाळासाहेब थोरात

लोकसभेत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे मोदी शासनाला परिणाम भोगावा लागेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देहलीच्या सीमेवर चालू असलेले शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे गांभीर्य शासनाने लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी नोंद घेतली नसल्याचे दिसून आले आहे.

रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेंच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी !

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यांच्या विरोधात पोलिसांनी ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणात पत्रकारानेच सुपारी देऊन केली हत्या !

रेखा जरे यांची हत्या ३० नोव्हेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून करण्यात आली. पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे, नागपूर आणि संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी : भाजपला पराभवाचा धक्का !

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पुणे, नागपूर आणि संभाजीनगर मतदार संघात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला आहे.

महाविकास आघाडी ५ वर्षे चालेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यशासनातील प्रत्येकजण समर्थपणे दायित्व निभावत असून हे शासन ५ वर्षे चालेल, असा विश्‍वास महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.