गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

मथुरेच्या राधा राणी मंदिरातही वस्त्रसंहिता !

यमुना नदीला आलेल्या पुरामुळे देहलीत सर्वत्र पाणी !

हरियाणातील हथनीकुंड धरणातून सातत्याने सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे यमुना नदीला पूर आला आहे. १३ जुलैला तर पाण्याने २०८.६६ मीटरची पातळी गाठली होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयाबाहेरील रस्त्यावर पाणी साचले होते.

‘चंद्रयान ३’ मोहीम भारतीय अवकाश संशोधनात ऐतिहासिक ठरेल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘चंद्रयान-३’ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटी यांचे प्रतीक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातही भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चंद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण आहे.

सर्वोच्च न्यायालयाची विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थन करणार्‍या १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यामागील सूत्रधार हा लष्कर-ए-तोयबाचा जिहादी आतंकवादी !

भारतातील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता !

राजस्थानमधील प्राचीन मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांच्या व्यवस्थापनाचे  अभिनंदन ! 

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला उर्दू भाषेत धमकीचा संदेश !

काही दिवसांपूर्वी भारतातील एका तरुणाच्या प्रेमात पडलेली एक पाकिस्तानी महिला तिच्या मुलांसह भारतात पळून आली होती. या पार्श्‍वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने ‘धार्मिक शिक्षण आणि अध्यात्मिक साधना’ या कार्यक्रमाचे आयोजन !

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने राज्यातील हवेरी जिल्ह्यात असलेल्या कोडियाला होस्पेट या गावी तपोक्षेत्र पुण्यकोटी मठात ‘धार्मिक शिक्षण आणि आध्यात्मिक साधना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यमुनेच्या पाण्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाहा:कार !

देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.

पाटलीपुत्र (बिहार) येथील भाजपच्या मोर्च्यावरील पोलिसांच्या लाठीमारात एका नेत्याचा मृत्यू

हा मोर्चा हिंसक झाला होता का ? मग पोलिसांनी एक नेता मरेपर्यंत लाठीमार का केला ? पोलिसांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !