पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ठार मारण्याचे विधान करणार्‍या मौलानावर कायदेशीर कारवाई करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना स्वतःला हे समजत कसे नाही ?

वादग्रस्त ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांच्याकडून क्षमायाचना ! 

‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटात अयोग्य संवादांचे लिखाण केल्याच्या प्रकरणी लेखक मनोज मुंतशीर यांनी क्षमायाचना केली आहे. मुंतशीर यांनी आरंभी श्री हमुमंतांच्या मुखी घातलेल्या वादग्रस्त संवादाचे ठामपणे समर्थन केले होते.

देशातील ७ राज्यांत पूरसदृश परिस्थिती ! 

देशातील ७ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये उत्तराखंड, आसाम, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ आणि यनागालँड या राज्यांचा समावेश आहे.

अमरनाथ यात्रा सलग दुसर्‍या दिवशीही स्थगित !

दक्षिण काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसर्‍या दिवशीही स्थगित करण्यात आली.

जिहादच्‍या विरोधात लढण्‍यासाठी हिंदूंनी शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक ! – नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

आपण त्‍या परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्‍याला आदर्श मानले जाते, तर खोटे बोलण्‍याला अधर्म समजले जाते. शत्रूशी लढण्‍यासाठी हिंदूंनी स्‍वयंबोध म्‍हणजे स्‍वत:चा धर्म समजून घेणे आवश्‍यक आहे, तसेच शत्रूचा प्रतिकार करण्‍यासाठी शत्रूबोधही करून घेणे म्‍हणजेच शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक आहे.

‘गीता प्रेस’ केवळ मुद्रणालय नाही, तर श्रद्धास्थान ! – पंतप्रधान मोदी

विदेशी आक्रमणकर्त्यांनी आमची ग्रंथालये जाळली होती. इंग्रजांनी आमची गुरुकुल परंपरा नष्ट केली. आमचे पूजनीय ग्रंथ लोप पावण्याच्या स्थितीत होते. अशा वेळी गीता प्रेससारख्या संस्थांनी त्यांना वाचवण्याचे काम केले. हे ग्रंथ आज घरोघरी पोचले आहेत. या ग्रंथांशी आपल्या पुढच्या पिढ्या जोडल्या जात आहेत.

मणीपूर हिंसाचारावरील टिप्‍पणीवरून भारताकडून अमेरिकेच्‍या राजदूतांची कानउघाडणी !

मणीपूरमधील ख्रिस्‍ती जमातीकडून हिंसाचार केला जात असून भारतीय सुरक्षायंत्रणा त्‍यांच्‍या विरोधात कारवाई करत आहेत. त्‍यामुळे ख्रिस्‍तीधार्जिण्‍या अमेरिकेला पोटशूळ उठतो, यात काय ते आश्‍चर्य ?

लोक मुसलमानांच्या भेदभावाविषयी का बोलतात ?, हा प्रश्‍न पडतो ! – हुमा कुरेशी, अभिनेत्री

हुमा कुरेशी यांच्या वक्तव्याविषयी ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे सांगणार्‍यांना काय म्हणायचे आहे ?

कोल्हापूर येथील ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता !

हिंदूंची कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असणार्‍या देवस्थानांच्या कामकाजात अनियमितता असल्याचे सांगत त्यांचे सरकारीकरण केले जाते; मात्र वक्फच्या संदर्भात तसे काहीच होत नाही, हीच धर्मनिरपेक्षता आहे, हे लक्षात घ्या !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवात्सल्याश्रात विनामूल्य दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त, इंदोर येथील भक्तवात्सल्याश्रमात विनामूल्य दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .