कोणत्याही धार्मिक समूहाकडून करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची असहिष्णुता रोखली पाहिजे !

न्यायालयाने म्हटले की, जर अशा प्रकारची सूत्रे स्वीकारली, तर कोणत्याही अल्पसंख्य समाजाला देशातील बहुतेक भागांमध्ये सण साजरे करता येणार नाहीत. यामुळे धार्मिक लढाई, दंगली होऊन त्यात लोकांचे प्राण जाऊन मोठी हानी होऊ शकते.

‘डी.आर्.डी.ओ.’च्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोरोनाप्रतिबंधात्मक औषधाला मान्यता

हे औषध कोरोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर ‘साहाय्यक उपचार पद्धत’ म्हणून वापरले जाईल. २-डीजी हे औषध पावडरच्या स्वरूपात येते. ते पाण्यात मिसळून घेतले जाते.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी तात्काळ नवा टूथब्रश वापरणे आवश्यक ! – तज्ञांचा सल्ला

कोरोनाचा पुन्हा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसाधनगृह वापरणार्‍या घरातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी असे करणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

सीकर (राजस्थान) येथे कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह पुरतांना नियमांचे उल्लंघन

सीकर जिल्ह्यातील खीरवा गावामधील एका कोरोनाबाधित रुग्णाचा गुजरातमधील सूरतमध्ये मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावामध्ये आणून पुरण्यात आला. यानंतर काही दिवसांत २१ लोकांचा मृत्यू झाला.

योगगुरु स्वामी आध्यात्मानंद यांचे कोरोनामुळे निधन पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

स्वामीजींनी देश-विदेशांत ८१४ शिबिरे घेऊन लोकांना योग, प्राणायम आणि चिंतन यांचे धडे दिले. त्यांनी वर्ष १९९९ मध्ये न्यू मेक्सिको येथील चियापास येथे झालेल्या ‘विश्‍व शांती संमेलना’त भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

देशात १ लाख ७० सहस्र रुग्णांना व्हेंटिलेटर्सची, तर ९ लाख रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता ! – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

सध्या देशात १ लाख ७० सहस्र ८४१ कोरोनाबाधितांना व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे, तर ९ लाख २ सहस्र २९१ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. कोरोनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

‘आय.एन्.एस्. विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर आग लागली !

भारतीय नौदलाच्या आय.एन्.एस. विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर ८ मे या दिवशी सकाळी आग लागल्याची घटना घडली. युद्धनौकेच्या सेलर अ‍ॅकोमोडेशन कम्पार्टेमेंट म्हणजेच नौकेवर असणार्‍यांची रहाण्याची सोय असणार्‍या भागामध्ये ही आग लागली.

कोरोना नियमांचे उल्लंघन करून मशिदींमध्ये सामूहिक नमाजपठण !

हरिद्वार कुंभेमळ्याच्या सूत्रावरून टीका करणारे तथाकथित निधर्मीवादी आता कुठे आहेत ?

ऑक्सिजन वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कृती दलाची स्थापना

देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बहुतेक रुग्णांचा मृत्यू होत आहे.

महाराष्ट्र कोरोनाच्या विरोधातील लढाई चांगली लढत आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विरोधात महाराष्ट्र चांगली लढाई लढत  आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी ८ मे या दिवशी कोरोनाच्या स्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.