एक खासदार घायाळ
पाटलीपुत्र (बिहार) – भाजपकडून राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पदावरून काढून टाकण्याच्या मागणीसाठी विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी त्यावर लाठीमार केला. या लाठमारात विजय कुमार सिंह हे नेते घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आल्यावर त्यांचा मृत्यू झाला. विजय सिंह हे जहानाबाद येथील भाजपचे महामंत्री होते. त्यांच्या डोक्यावर लाठीमार करण्यात आल्याने ते घायाळ झाले होते. पोलिसांच्या लाठीमारात भाजपचे खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल हेही घायाळ झाले. पोलिसांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, माजी उपमुख्यमंत्री रेणू देवी यांना अटक केली आहे.
Complete chaos breaks out in Patna after BJP workers hold a massive protest against Tejashwi Yadav in land for jobs scam. Republic brings shocking #LIVE visuals from Bihar’s Patna.#Bihar #BJP #TejashwiYadav #RJD #Patna #LandForJobsScam
WATCH #LIVE here-… pic.twitter.com/5hjA88eTjk
— Republic (@republic) July 13, 2023
संपादकीय भूमिकाहा मोर्चा हिंसक झाला होता का ? मग पोलिसांनी एक नेता मरेपर्यंत लाठीमार का केला ? पोलिसांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा ! |