गुढीपाडव्याचा सण सात्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

या गुढीपाडव्याला, तसेच वर्षभरात येणार्‍या सर्व हिंदु सणांना पारंपरिक आणि सात्त्विक हिंदु पोषाख परिधान करून अन् शक्य असल्यास सोन्या-चांदीचे सात्त्विक पारंपरिक अलंकार परिधान करून आणि वेणी, खोपा किंवा आंबाडा यांसारखी सात्त्विक केशरचना करून देवतांचे शुभाशीर्वाद संपादन करूया.’

स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वतः उभे ठाका ! – उमा आनंदन, उपाध्यक्ष, टेम्पल वर्शिप सोसायटी, फ्री टेम्पल मुव्हमेंट, तमिळनाडू

श्री चिदंबरम् मंदिर हिंदूंच्या कह्यात येण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयावर ३ वेळा सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागली. या मंदिरातील पैसा आजही निधर्मी सरकारवर खर्च होतो. या मंदिरातून ६ सहस्र कोटी रुपये निधी जमा होतो; पण येथील पुजार्‍यांना तुटपुंजे वेतन दिले जाते.

हिंदु राष्ट्र

भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणारच आहे, ‘हालसिद्धनाथांचे’, हे भाकित आहे, जगात केवळ हिंदु धर्मच असणार आहे, जगात ‘भगवा झेंडा’ फडकेल आणि ‘हिंदु धर्मच’ पसरेल.

अन्य प्रार्थनास्थळे नाहीत, तर केवळ हिंदूंची मंदिरे सरकारच्या कह्यात ! – अधिवक्ता अंकुर शर्मा, जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय, देहली

भारतीय राज्यघटनेतील कलम २६ प्रमाणे भारत सरकारला सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांना अधिग्रहित करण्याचे अधिकार असतांना आजवर केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत.

मंदिरे वाचली, तरच धर्म वाचेल अन् धर्म वाचला, तरच राष्ट्र वाचेल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

निधर्मी सरकार केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेत आहे. जे सरकारी आस्थापने चालवू शकत नाहीत, ते मंदिरे काय चालवणार ?

अनन्वित छळ सहन करूनही धर्मांतराला नकार देणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या अलौकिक सामर्थ्याचे बीज शोधा !

‘छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतराला नकार दिला; म्हणून औरंगजेबाने संभाजीराजांचा अनन्वित छळ केला. त्यांच्या डोळ्यांत तिखट टाकले. एकेक अवयव तोडला. त्यात मीठ भरले, तरीही संभाजीराजांनी हिंदु धर्म सोडला नाही.

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्‍चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची लाज वाटते. घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे मुलींना वाटते……

राजकारणात निवृत्तीचे वय किती ?

अमेरिकेसारख्या देशात एकदा मोठी पदे (अध्यक्ष) भोगल्यास वयस्कर व्यक्ती निवृत्त होतात, तसेच तरुण नेत्यांना वाव देतात. असे अनुकरण आपण का करू नये ?

दीक्षांत समारोहाला डोक्यावर ख्रिस्त्यांप्रमाणे असणारी टोपी भारतात नको !

कु. नकुशा रामा नाईक ही ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम आली. तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी तिने डोक्यावर दीक्षांत समारोहासाठी पाश्‍चात्त्यांच्या संस्कृतीप्रमाणे टोपी घातली होती.