स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वतः उभे ठाका ! – उमा आनंदन, उपाध्यक्ष, टेम्पल वर्शिप सोसायटी, फ्री टेम्पल मुव्हमेंट, तमिळनाडू

श्रीमती उमा आनंदन्

श्री चिदंबरम् मंदिर हिंदूंच्या कह्यात येण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयावर ३ वेळा सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागली. या मंदिरातील पैसा आजही निधर्मी सरकारवर खर्च होतो. या मंदिरातून ६ सहस्र कोटी रुपये निधी जमा होतो; पण येथील पुजार्‍यांना तुटपुंजे वेतन दिले जाते. आपल्या पुढील पिढीला समृद्ध वारसा देण्यासाठी आपण जागृत झाले पाहिजे. तमिळनाडूतील एका लहान खेड्यातील पुरातन मंदिरातील मूर्ती नेण्यासाठी सरकारी अधिकारी आले असतांना तेथील लोकांनी त्यांना विरोध केला आणि मूर्ती नेण्यामागील कारण विचारले. शेवटी अधिकार्‍यांना रिकाम्या हाती परत जावे लागले. स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वतः उभे ठाकायला हवे, मग आम्हाला सरकार किंवा इतर तिसर्‍या कुणाच्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.