केवळ मंदिरात जाणारे नव्हे, तर त्यांचे रक्षण करणारे हिंदु व्हा ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, पंढरपूर

जर मंदिरात होणारी एखादी परंपरा पटत नसेल, तर त्याची तक्रार सरकारकडे न करता आपले धर्मगुरु, शंकराचार्य अथवा हिंदु जनजागृती समिती यांच्याकडे करा.

प्रभु श्रीराम आदर्श आहेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे !

कुठे ‘भ्रष्टाचार’ करून जनतेचे कुपोषण करणारे सर्वपक्षीय ‘राजकारणी’, तर कुठे प्रजाहितदक्ष असलेले समृद्ध रामराज्य देणारे श्रीराम ! असे हे प्रभु श्रीराम आदर्श आहेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे !

उशिरा जागे झालेले महाराष्ट्र सरकार !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील ऑक्सिजन निर्माण करणार्‍या आस्थापनांना १०० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी देण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे.

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा गुन्हा कसा काय असू शकेल ?

उद्या जर आतंकवाद्यांनी भारतावर आक्रमण करून त्याला ‘इस्लामिक राष्ट्र’ म्हणून घोषित केले, तर हिंदू जाणार कुठे ? हिंदूंसाठी हक्काचे स्थानच नाही. स्वातंत्र्याच्या वेळी ‘निसर्गतः’ भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

साधकांनी, तसेच धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी हिंदु राष्ट्रातच गुरु किंवा देव यांना पहायचा प्रयत्न केला, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य, ही गुरुसेवा असून ते ईश्‍वरप्राप्तीचे साधन आहे’, असा भाव ठेवला, तर त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याविषयी प्रेम वाटून त्यासाठी जीवन समर्पित करण्याची त्यांची सिद्धता होईल.’

गुढीकडून घ्यावयाचा बोध

गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्‍वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करून इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते. त्याप्रमाणे साधकाने स्वत: साधना करून आनंद मिळवावा आणि समाजातही साधनेचा प्रसार करावा.

गुढीपाडव्याविषयी महाभारतातील उल्लेख

महाभारतातच खिलपर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा समादेश देतो. महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे.

आंब्याच्या पानांचे महत्व

ईश्‍वराकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या कोवळ्या पानात ३० टक्के, तर आंब्याच्या परिपक्व पानात १० टक्के असते. कोवळ्या पानात तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळ्या पानांचा वापर करावा.

कडूलिंबाच्या पानांचे महत्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.

हिंदु संस्कृतीची प्राचीनता !

२०२० या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२२ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.