अमेरिकेची (अ)नीती !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले ‘काश्मीरप्रश्‍नी चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझे साहाय्य मागितले होते’, हे विधान पूर्णतः खोटे असल्याचे भारताचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केले आणि अमेरिका उघडी पडली !

योगाभ्यास प्रतिदिनच हवा !

२१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिन पार पडला. गेली अनेक वर्षे योगऋषि रामदेवबाबा समाजातील प्रत्येक व्यक्तीने योगासने करावीत, यासाठी पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये जागृती करत आहेत. ते समाजमनावर योगाभ्यासाचे लाभ आणि बिंबवत असलेले महत्त्व पाहून कोणालाही ‘योगाभ्यास करूया’, असेच वाटते.

भारताला ‘नाटो’ देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेत संमत

भारताला ‘नाटो’ (फ्रान्स, बेल्जियम, लक्झमबर्ग, ब्रिटेन, नेदरलॅण्ड, कॅनडा, डेन्मार्क, आइसलॅण्ड, इटली, नार्वे, पोर्तुगाल आणि संयुक्त राज्य अमेरिका) देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेने संमत केले आहे.

मारहाण करण्याची घटना स्वीकारली जाणार नाही !

मध्यप्रदेशातील इंदूर येथील भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेेलेल्या महापालिकेच्या अधिकार्‍यांना बॅटने मारहाण केली होती.

तुम्ही पाकिस्तान आणि सिरीया येथे राहू इच्छिता का ?

‘भारतात मुसलमान भीतीच्या छायेखाली वावरत आहेत’, असे चित्र निर्माण करू पहाणार्‍या मुसलमान महिला पत्रकाराला काँग्रेसचे माजी नेते आरिफ महमंद खान यांचा सडेतोड प्रतिवाद ! कोणत्याही इस्लामी देशांपेक्षा भारतातील मुसलमानांची स्थिती किती चांगली आहे, हे यावरून लक्षात येते !

आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांनी एकत्र यावे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आतंकवाद केवळ निष्पाप लोकांचे बळीच घेत नाही, तर आतंकवादामुळे विकासाची गती आणि सामाजिक समानता यांवरही परिणाम होतो. आतंकतवाद हा माणुसकीचा सर्वांत मोठा शत्रू आहे. या समस्येशी लढणे, हे आपल्यापुढील आव्हान आहे.

मोदी सरकारच्या काळातच राममंदिर होणार ! – शिवसेना

राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला, तरी जनतेच्या न्यायालयाने त्याचा निर्णय नुकताच सुनावला आहे. पंतप्रधानांच्या कार्यकाळात अयोध्येत राममंदिर होईल, असा विश्‍वास शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत व्यक्त केला.

काँग्रेसचा पराभव म्हणजे देशाचा पराभव आहे का ? – पंतप्रधान मोदी

‘ही निवडणूक देशाने हरली’ असे म्हणणे यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान असू शकत नाही. अमेठीत भारताचा पराभव झाला का ? वायनाडमध्ये, रायबरेलीत भारताचा पराभव झाला का ? देशातील लोकांना विचार करायला लावणारी ही गोष्ट असून काँग्रेसचा पराभव म्हणजे देशाचा पराभव आहे का ?

विटा येथे फेसबूकवरील पोस्टद्वारे पंतप्रधानांचा अवमान करणार्‍या धर्मांधाला अटक

येथील धर्मांध जमीर मुल्ला याने फेसबूक या सामाजिक माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारी पोस्ट शेअर केली. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

खटले प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची संख्या वाढवा ! – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिशांची संख्या अपुरी पडत आहे. न्यायालयात केवळ ३१ न्यायाधीश असून ५८ सहस्र ६६९ खटले प्रलंबित आहेत.


Multi Language |Offline reading | PDF