बंगालमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर तृणमूल काँग्रेसने गंगाजल शिंपडून केली मैदानाची ‘शुद्धी’ !

येथील मैदानात २२ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात जाऊन गंगाजल शिंपडून त्याचे ‘शुद्धीकरण’ केले. तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांच्या नेतृत्वाखाली हे शुद्धीकरण करण्यात आले.

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला देहली येथील शेतकरी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या ग्रेटा थनबर्ग हिला बोलावणार

देशातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कार्यक्रमाला बोलावण्यामागील आयोजकांचा हेतू काय आहे ? याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी !

(म्हणे) ‘पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी पाठवलेला प्रस्ताव अयशस्वी ठरला !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्यासाठी इम्रान प्रयत्न करत आहेत .

एखाद्या राजासारखे वागू नका ! – पंतप्रधान मोदी यांचा भाजपच्या नेत्यांना सल्ला

‘सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू आहे’, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. ते पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करत होते.

शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार परत न करणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार भारताला परत न देणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीवर क्रिकेट खेळू देणार नाही.

नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले ! – चंद्रकांत पाटील, भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष मुसलमान विरोधी नसून नरेंद्र मोदी यांनीच भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्र्रपती केले, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळेच इंधन आणि गॅस यांची भाववाढ ! – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस

कोरोना काळातील लसीकरण, किसान सन्मान योजना, विनामूल्य गॅसचे वाटप या योजना राबवल्याचे मोदी सरकार सांगत आहे; परंतु सरकारी तिजोरीतून वाटलेल्या पैशांहून अधिक पैसे मोदी सरकारने जनतेच्या खिशातून काढले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कायद्यावर शेतकर्‍यांचे सार्वत्रिक मतदान घ्यावे ! – वि.द. बर्वे, सामाजिक कार्यकर्ते

वि.द. बर्वे यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या शेतकर्‍यांची नावे सात-बाराच्या उतार्‍यावर असतील त्यांनाच मताचा अधिकार देऊन सार्वत्रिक मतदान घेऊन ज्यांची बाजू खरी असेल, हे सिद्ध होऊ द्या. ‘दूध का दूध और पानी का पानी’, ठरवण्याचा अधिकार शेतकर्‍यांना लाभू द्या.

कार्यालयीन कामाचे वेगवेगळ्या वेळांचे नियोजन आखण्यासाठी केंद्रशासनाने राष्ट्रीय धोरण आखावे !

कार्यालयीन कामाची सकाळी १० ते सायंकाळी ५ या पारंपरिक वेळेची मानसिकता पालटून वेगवेगळ्या वेळांचे नियोजन करणे आवश्यक आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

जगभरात दहशत आणि हिंसा पसरवण्यात उच्चशिक्षितांचा सक्रीय सहभाग ! – पंतप्रधान मोदी

जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे आणि हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित अन् व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्‍व भारती विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभामध्ये म्हटले.