नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले ! – चंद्रकांत पाटील, भाजप

चंद्रकांत पाटील

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष मुसलमान विरोधी नसून नरेंद्र मोदी यांनीच भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्र्रपती केले, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणांना जोडण्यासाठी ‘युवा वॉरियर्स’ अभियानाचा प्रारंभ चंद्रकांत पाटील यांनी केला. त्या वेळी ते बोलत होते.

वर्ष २००२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. वाजपेयी यांच्या कार्यकाळात सर्वसंमतीने अब्दुल कलाम राष्ट्र्रपती झाले. त्यांची निवड मोदींनी केली होती, असे म्हणत एका चांगल्या देशभक्ताला अपकीर्त करू नका, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.