पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या पटोले यांना अटक करा ! – केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश, भाजप

१८ जानेवारी या दिवशी भाजप  प्रदेश कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. भंडारा येथे काही नागरिकांशी संवाद साधतांना पटोले यांनी ‘मी मोदी यांना शिव्या देऊ शकतो. मारू शकतो’, असे वक्तव्य केले होते.

भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने १८ जानेवारी या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

प्रजासत्ताकदिनी आतंकवादी आक्रमणाची शक्यता

देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आतंकवादाच्या सावटाखाली साजरा करावा लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी आणि शीख यांच्यापैकी एकाची निवड करा !’

खलिस्तानी आतंकवादी संघटनांचा निःपात न केल्यामुळेच त्यांचे दुःसाहस वाढत चालले आहे, हे यातून दिसून येते. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

पंतप्रधानांच्या सुरक्षेत नेमकी त्रुटी कुठे राहिली ?

माजी पोलीस महासंचालक दीक्षित यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अतीमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व पार पाडले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत नेमकी त्रुटी कुठे राहिली ? या प्रकरणाविषयी त्यांचे म्हणणे येथे देत आहोत.

सर्वोच्च न्यायालयाने बनवली अन्वेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती !

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संरक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे प्रकरण

युवकांनो, वर्ष २०४७ मधील ‘समृद्ध भारत’ पहाण्यासाठी आतापासून उत्साहाने प्रयत्न करा ! – पंतप्रधान

आज भारत ‘स्टार्टअप’च्या सुवर्ण युगात प्रवेश करत आहे. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या प्रसंगी, म्हणजे वर्ष २०४७ मधील समृद्ध भारत पहाण्यासाठी युवकांनी आतापासूनच उत्साहाने प्रयत्न करावेत. मला देशाच्या युवा पिढीवर संपूर्ण विश्‍वास आहे !

पनवेल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी विरूपाक्ष मंदिरात महामृत्युंजय जप !

भाजपचे उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली १० जानेवारी या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही घटना आणि पंजाब काँग्रेस सरकार यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द !

पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ जानेवारी या दिवशी पुणे दौर्‍यावर येणार होते. मात्र कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांचा हा दौरा रद्द केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे.