प्रजासत्ताकदिनी आतंकवादी आक्रमणाची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका

देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आतंकवादाच्या सावटाखाली साजरा करावा लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

देहली – प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर आतंकवादी आक्रमणाचा कट रचण्यात आला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार्‍या मान्यवरांच्या जिवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी देण्यात आली आहे.
‘इंडिया टुडे’ या वृत्तसंकेतस्थळाने गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या ९ पानी अहवालाच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त दिले आहे. कोरोना महामारीमुळे भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अन्य देशांचे नेते उपस्थित रहाणार नाहीत.