पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या पटोले यांना अटक करा ! – केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश, भाजप

डावीकडून केशव उपाध्ये आणि नाना पटोले

मुंबई – पंतप्रधानांविषयी संतापजनक वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा नोंद करण्याऐवजी पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांनाच अटक करत आहेत. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी पटोले यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली.

१८ जानेवारी या दिवशी भाजप  प्रदेश कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. भंडारा येथे काही नागरिकांशी संवाद साधतांना पटोले यांनी ‘मी मोदी यांना शिव्या देऊ शकतो. मारू शकतो’, असे वक्तव्य केले होते.